मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघांना राजूर पोलिसांनी केली अटक
राजूर | Rajur: गुरुवारी राजूर पोलिसांनी कारवाई करत २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या राजूर येथे मोबाईल शॉपी फोडून सराईत दोन चोरांना मुद्देमालासह अटक केल्याची माहिती राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे.
राजूर येथील तौफिक आयुब तांबोळी यांचे २७ ऑक्टोबर रोजी मोबाईल शॉपीचे दुकान फोडण्यात आले होते. याबाबत तौफिक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत ३० हजार ३५३ रुपयांचे दुकानातील साहित्य चोरून नेण्यात आले होते.
ही चोरी घाटघर येथील विष्णू विठू सोडनर याने केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळे, प्रवीण थोरात यांस विष्णू सोडनर यास ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने समशेरपूर येथील चिंचाचे वाडी येथील सोमनाथ शिवाजी भूताम्बरे याच्या मदतीने मोबाईल फोडली असल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी भूताम्बरे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
Web Title: Rajur Mobile shop theft arrested