राज्यात या तारखेला पावसाचे संकट, पंजाब डख यांचा अंदाज
Ahmednagar | Rain Alert: राज्यातील अनेक भागांत सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि अन्य पिकांची काढणीचे काम सुरु आहे. त्यात पुन्हा भारतीय हवामान विभाग पुणे आणि हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 8 ते 11 मार्चदरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टी या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Rain weather alert 2022) यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळणार आहे.
7 ते 9 मार्चला राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आयएमडी पुणे यांनी तर 8 ते 11 मार्च दरम्यान पावसाची शक्यता मराठवाड्यातील हवामान अभ्यासक डख यांनी वर्तवली आहे. पिकांची काढणी 7 मार्चपर्यत पूर्ण करावी, असे पंजाब डख यांनी सांगितले आहे. राज्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून यामुळे रिमझिम पाउस पडत राहील 8 ते 11 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहून उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टी या चार भागात जास्त पाऊस राहील उर्वरीत भागात तुरळक पडण्याचा अंदाज डख यांचा आहे. तसेच 7 ते 11 मार्च दरम्यान देशात तामीळनाडू, केरळ, कर्नाटक आध्रंप्रदेश या राज्यात जोरदार पाउस पडणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे.
Web Title: Rain crisis in the state on this date, Punjab Dakh forecast