संगमनेर तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यावर छापे
Breaking News | Sangamner Crime: पाच अवैध दारु विक्रेत्यांवर छापे घालून ७३ हजार ४०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त.
संगमनेर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने घारगाव (ता. संगमनेर) येथे पाच अवैध दारु विक्रेत्यांवर छापे घालून ७३ हजार ४०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलिस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, शाहीद शेख, गणेश धोत्रे, रणजित जाधव, रमीजराजा आत्तार व उमाकांत गावडे यांच्या पथकाने घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांवर छापे घालून पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Web Title: Raids on illegal liquor seller in Sangamner