Home अहमदनगर संगमनेरात वेश्या व्यवसायावर छापा, संगमनेरसह अकोलेतील ग्राहकांवर गुन्हा, पश्चिम बंगालची मुलीसह चौघींची...

संगमनेरात वेश्या व्यवसायावर छापा, संगमनेरसह अकोलेतील ग्राहकांवर गुन्हा, पश्चिम बंगालची मुलीसह चौघींची सुटका, महिलेला अटक

Breaking News | Sangamner: पठार भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोखरी बाळेश्वर शिवारात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा पश्चिम बंगालमधील महिलेसह चार महिलांची सुटका.(Raid on prostitution business)

Raid on prostitution business in Sangamner, crime against clients

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोखरी बाळेश्वर शिवारात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा पश्चिम बंगालमधील महिलेसह चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.  या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.   तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरी बाळेश्वर शिवारात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळताच त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना कारवाईचे आदेश दिले. वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पश्चिम बंगालमधील महिलेसह चार महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तर काही ग्राहकांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात वैशाली उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता. संगमनेर) ही महिला स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे आमिष देऊन त्यांना देह व्यापारास प्रवृत्त करुन स्वतःच्या मालकीच्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये जागा उपलब्ध करुन देवुन त्यांचेकडुन देह विक्री व्यापार करुन घेत होती.

कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी एका बनावट ग्राहकाला पाठवले होते येथे व्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वैशाली उत्तम फटांगरे हिच्या पत्र्याचे शेडवर छापा टाकला आणि चार पिडीत महिलांची सुटका केली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत कुंटनखान्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह मोबाईल, रोख रक्कम, वाहने असा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, (नेम. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६/२०२४ नुसार भा.द.वि. कलम ३७०, ३४. सह स्त्रीया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे वैशाली उत्तम फटांगरे (वय ४८ वर्षे रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता. संगमनेर), सोमनाथ यादव सरोदे रा. आनंदवाडी ता. संगमनेर (फरार), दिपक उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर) यांनी संगनमत करुन ग्राहक आरोपी सागर वसंत लेंडे (वय २५ वर्षे रा. नांदुर खंदरमाळ ता. संगमनेर), रामदास अशोक मोरे (वय २९ वर्षे रा. धुमाळवाडी रोड, अकोले ता. अकोले) व शुभम बाळासाहेब मतकर (वय २२ वर्षे रा. निमज ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, तालुका लीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांच्यासह पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस ईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग, संतोष फड, ताई शंदे, नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर व भो.उप.निरी. उमेश पतंगे, पोकॉ प्रमोद बाडेकर, घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे, नामदेव बिरे यांनी ही कारवाई केली. नपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर घारगांव पोलीस स्टेशन हे करित आहेत.

Web Title: Raid on prostitution business in Sangamner, crime against clients

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here