Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  हुक्का पार्लरवर छापा

अहिल्यानगर:  हुक्का पार्लरवर छापा

Breaking News | Ahilyanagar Crime: हाऊस ऑफ स्मोक हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकत सहा हजार रुपये किमतीची तंबाखू जप्त.

Raid on hookah parlor Ahilyanagar

अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील पाइपलाइन रोडवरील सहकार नगर येथील महादेव मंदिराजवळील हाऊस ऑफ स्मोक हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकत सहा हजार रुपये किमतीची तंबाखू जप्त केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे.

सुमित संजय ढापसे (वय २०, रा. वंजगार गल्ली, रामचंद्रखुंट) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. पाइपलाइन रोडवरील सहकारनगर परिसरात हुक्का पार्लर चालविला जात आहे, अशी खात्रीशीर माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी

हाऊस ऑफ स्मोक या हुक्का पार्लरवरच छापा टाकला असता हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे, प्लास्टिकचे डबे आदी साहित्य मिळून आले. हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही पोलिसांनी सावेडीतील सोनानगर येथील कॅफेवर छापा टाकत गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Web Title: Raid on hookah parlor Ahilyanagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here