अवैध दारू विक्री छापेमारी, राजूरमध्ये तळघरात लपवलेली दारू जप्त
Akole, Rajur News: राहत्या घरात सिनेस्टाईल पद्धतीने घराच्या तळघरात लपवून ठेवलेली दारू जप्त (raid).
राजूर: नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने राजूर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात मोहीम राबवीत छापेमारी केली. यावेळी आरोपीने राहत्या घरात सिनेस्टाईल पद्धतीने घराच्या तळघरात लपवून ठेवलेली दारू जप्त केली.
आरोपी संजय अदालतनाथ शुक्ला (रा. राजूर) याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर जिल्ह्या हद्दपारी करण्यात आली आहे. या आरोपीने घराच्या तळघरात लपवलेली ३९ हजार ३४० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. दुसरी कारवाई हॉटेल हिरा येथे करण्यात आली.
त्यात एका आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहोम, बशीर तडवी, पो. हवालदार शकील अहमद शेख, प्रमोद मंडलिक, महिला पो. छाया गायकवाड यांनी केली.
Web Title: raid, liquor hidden in basement seized in Rajur
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App