वेश्या व्यवसायावर छापा, तीन महिलांची सुटका, दोघे अटकेत
Ahmednagar | Rahuri News | राहुरी: राहुरी तालुक्यात एकाच वेळी दोन ठिकाणी छापा टाकून वेश्या व्यवसाय (prostitution Business) करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. डीवायएसपी संदीप मिटके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की, . डीवायएसपी संदीप मिटके यांना राहुरीतील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी जाणारे रोडवर न्यू प्रसादच्या शेजारी वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. त्याप्रमाणे बनावट ग्राहक बनून दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून पंचासमक्ष छापा टाकून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद फरहाद इरशाद अहमद वय ३४ रा. राहुरी महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलम १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मीना नाचण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू शिवाजी इंगळे रा. इंदिरानगर वार्ड नंबर ६ श्रीरामपूर याच्या विरोधात महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलम १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके व त्यांच्या पथकाने केली.
Web Title: Rahuri Raid on prostitution Business release of three women