Rahuri Minor Girl Kidnap: अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल.
राहुरी: राहुरी येथून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण (दि. १७) झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई सोबत राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात राहते.
या घटनेतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी १७ जुलै रोजी रात्री १० वाजेदरम्यान जेवण व घरातील रोजची कामे झाल्यानंतर झोपी गेली होती. मात्र पहाटे चार वाजेदरम्यान ती घरात आढळून आली नाही. ती बेपत्ता झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. मुलीच्या नातेवाइकांनी तिचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली. नाही. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शहामद शेख हे करीत आहेत.
Web Tile: Rahuri Minor girl kidnap