अहमदनगर ब्रेकिंग: माजी नगरसेविकेवर गोळीबार
Rahuri Firing | राहुरी: राहुरी तालुक्यात माजी नगरसेविका यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांच्या कन्या व माजी नगरसेविका सोनाली बर्डेंवर शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. आरोपींनी सोनाली यांच्या पतीवर निशाणा लावला होता. मात्र गोळी सोनाली यांना लागली. गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. त्या जखमी झाल्या असूनत्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
वाचा: Ahmednagar News
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लहान मुलांच्या भांडणातून उद्भवलेल्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेले बर्डे यांच्या शेजारीच राहतात. त्यांनी घरात घुसून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या घटनेनंतर मोठी गर्दी जमली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: Rahuri Firing Former corporal shot dead