Crime: महिला जेवणाचा डबा घेऊन जात असताना विनयभंग
Ahmednagar News Live | Rahuri Crime | राहुरी: एक 48 वर्षीय महिला जेवणाचा डबा घेऊन पायी जात असताना तिचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यात दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. ती महिला जात असताना सुरेश झारेकर याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत त्या महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान महिला तिच्या मुलाचा जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या किराणा दुकानाकडे जात होती. यावेळी तिच्या घरासमोर सुरेश झारेकर याने त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच शिवीगाळ केली. तू आता माझ्या तावडीतून वाचलीस. पुढच्या वेळेस तुझा बेतच पाहतो. अशी धमकी दिली. त्यावेळी तीन आरोपींनी मिळून त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या फिर्यादीवरून आरोपी सुरेश भास्कर झारेकर, भास्कर सयाजी झारेकर व संगिता सुरेश झारेकर या तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक अमित राठोड करीत आहेत.
Web Title: Rahuri Crime Humiliation while a woman is carrying a lunch box