Accident: मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी
Ahmednagar | Rahuri | राहुरी: मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी (Accident) झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी परिसरात बुधवारी रात्री घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपरगावहून मानोरीकडे सिंमेट गोण्या घेऊन जाणारा मालवाहतूक (एम.एच.१६ सी.ऐ. ६५७७) हा ट्रक हा ठुबे वस्ती अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला शेतात ट्रक घुसून पलटी झाला. चालकाला अंधारात अंदाज न आल्याने रस्याच्या बाजूला शेतात हा ट्रक घुसला असून पलटी झाला आहे. या ट्रकमधील महिला व चालक बालंबाल बचावले आहेत. ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Title: Rahuri Accident truck overturned after losing control of the truck driver