Home अहमदनगर टेम्पोने उडविल्याने दोन युवक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

टेम्पोने उडविल्याने दोन युवक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

टेम्पोने उडविल्याने दोन युवक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

राहता: रस्त्यावर उभ्या असलेले व मोटारसायकलवरील युवकांना आयशर कंपनीच्या टेम्पोने दिलेल्या जोराच्या धडकेत काकडी गावातील दोन युवक जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमीवर शिर्डी येथील संस्थांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा दुर्दैवी अपघात राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत काकडी गावात गुरुवार दिनांक ८ रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडला.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

साईबाबांचे दर्शन घेऊन परतले नंतर काकडी गावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटार सायकल स्प्लेंडर प्लस एम. एच. १७ ए. डी. ४८४९ व स्प्लेंडर प्लस मोटार सायकल एम. एच. १७ बी.आर. ४८६० वरील चार युवकांना टर्बो टेम्पो नंबर एम.एच. 12 एफ. झेड. ४४६७ वरील चालक दत्तात्रय काळूराम चव्हाण याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत जोराची धडक दिली. या अपघातात शुभम अशोक जाधव व आकाश सुभाष भालेराव रा. काकडी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश विलास भालेराव , प्रसाद राजेंद्र भालेराव हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे. अपघातादरम्यान झालेल्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ मदतीकरिता धावले. मात्र दोन युवक जागीच ठार झाले तर दोन जखमी होते. जखमींना तातडीने साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, ऐन दिवाळी सणाच्या काळात गावातील युवक दगावल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याप्रकरणी राजेंद्र तुकाराम भालेराव याच्या फिर्यादीवरून राहता पोलीस टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Website Title: Rahata Taluka News Two youths were killed on the spot due to tempo


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here