Murder: खळबळजनक घटना: महिलेची निर्घृण हत्या
राहता | Murder: राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या महिलेचे वय साधारणतः ५० ते ५५ वर्षे असेल. मंगळवारी सकाळी या महिलेची हत्या झाल्याचे लक्षात आले. ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये राहात होती. ती कामगार असल्याने दिवसभर काम करून तिथेच राहात असे. याबाबत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अजून समोर येत आहे.
Web Title: Rahata Taluka Brutal murder of a woman