Suicide: राहत्यात सख्ख्या चुलत भावा बहिणीची आत्महत्या
Ahmednagar | Rahata | राहता: राहत्या तालुक्यातील शिर्डीलगत असलेल्या सावळीविहीर या गावात रविवारी सायंकाळी सख्ख्या चुलत भावा बहिणीने आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.
रोशनी साहेबराव शिरोळे वय १९ व सागर राजेंद्र शिरोळे वय २३ अशी त्यांची नावे आहेत. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात सुजाता जितेंद्र आठवले यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची बहिण रोशनी साहेबराव शिरोळे वय १९ ही तीन वर्षापासून त्यांच्या घरात राहत होती. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा चुलत भाऊ सागर राजेंद्र शिरोळे रा. पुणे हा त्यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. त्या नोकरीवरून घरी परतल्या तेव्हा या दोघांचे मृतदेह त्यांना पाहायला मिळाले. या घटनेबाबत फिर्यादी सुजाता जितेंद्र आठवले वय ३२ रा, सावळीविहीर यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Rahata Suicide of a number of brothers and sisters in the residence