Suicide | येणे 24 लाख रुपये परत न दिल्याने व्यावसायिकाची आत्महत्या
राहाता | Rahata: आरोपींनी येणे पैसे परत न दिल्याने गॅरेज मालक महेंद्र लोढा वय (46) यांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील साकुरी येथे मंगळवारी पहाटे ही घटना घडली. यामुळे शहरातील व्यवसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मयत लोढा यांचा मुलगा सिद्धार्थ लोढा यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील महिंद्र लोढा यांना विलास कोंडीराम सोनवणे यांच्या कडून 18 लाख व रमेश आनंदा काळोखे 8 लाख (दोघे राहणार राहाता) यांच्याकडून घेणे बाकी होते. या पैशांची माझे वडील मयत महेंद्र लोढा यांनी सदर दोन व्यक्तींकडे वेळोवेळी केली असताना काळोखे व सोनवणे या दोन व्यक्तींसह त्यांच्या काही मित्रांनी माझ्या वडिलांना धमकावून आम्ही पैसे देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे बोलून वडिलांशी वाद घालत घातले व त्यांना विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी विलास कोंडीराम सोनवणे व रमेश आनंदा काळोखे व त्यांच्या 3 साथीदारा विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 203/2022 भा.दं.वि कलम 305,306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करत आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Rahata Businessman commits suicide