पोलीस असल्याचे सांगुन तुम्ही मास्क घातला नाही म्हणून ४ हजारास गंडा
राहता | Rahata: फिल्मी स्टाईलने रस्ता लुटीची रंजक घटना घडल्याने पिंपरी निर्मळ परीसरात जोरात चर्चा रंगली आहे.
बाभळेश्वरकडून पिंपरी निर्मळला येताना 400 केव्ही सबस्टेशनजवळ एका दुचाकीस्वाराने पिंपरी निर्मळ येथील विना मास्क असलेल्या व्यक्तीला अडवून पोलीस असल्याचे सांगत तुम्ही मास्क घातलेला नाही मागून साहेब येत आहेत. खिशातले सामान बाहेर काढा म्हणत 4 हजार घेवून पोबारा केला. तसेच जाताना या व्यक्तीला नवा कोरा मास्कही दिला. त्यामुळे हा मास्क त्यांना चार हजारांना पडला आहे.
बाभळेश्वरकडून आपल्या दुचाकीवर विना मास्क घरी येत असताना पिंपरी निर्मळ शिवारातील 400 केव्ही सब स्टेशन जवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना थांबविले. आपण मास्क घातलेला नाही. बाभळेश्वर चौकात साहेबांनी आपल्याला विनामास्क पाहिले असून मी पोलीस आहे व साहेब मागुन येत आहेत. तुमच्यावर कडक कारवाई करतील. खिशात काय असेल ते बाहेर काढा असा दम भरला.
या व्यक्तीनेही खिशातीला पैसे व सामान बाहेर काढले. खिशातुन काढलेले चार हजार त्या ठकसेनाने स्वतःच्या खिशात घातले व आपल्याकडील नवा कोरा मास्क पिंपरी निर्मळ येथील व्यक्तीला दिला व मास्क लावा व साहेब येण्याच्या आत पटकन निघून जा असा सल्ला देवुन स्वतःही निघून गेला. मात्र हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर तुम्हाला कोणीतरी फसविले आहे.
Web Title: Rahata 4,000 fraud because you didn’t wear a mask saying a policeman