Home महाराष्ट्र तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

Raghuvir Khedkar Corona Positive

प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती डॉ. माणिकराव शेवाळे यांनी दिली आहे. 

रघुवीर खेडकर यांच्या बहिणीला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

स्वतः रघुवीर खेडकर व त्यांच्या तीन बहिणी, मेहुणे, भाचा, सुना अशा ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. माणिकराव शेवाळे यांनी सांगितले.

या कुटुंबातील काही जणांचा एचआरसीटीचा स्कोर थोडा अधिक आहे. त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले असून उपचार सुरु आहेत. खेडकर कुटुंबातील सदस्य लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. खेडकर कुटुंबाचा मी फॅमिली डॉक्टर आहे.

Web Title: Raghuvir Khedkar Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here