Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलले राधाकृष्ण विखे पाटील, म्हणाले…..

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलले राधाकृष्ण विखे पाटील, म्हणाले…..

Sarpanch Murder Case:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच स्पष्ट केले की, यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.

Radhakrishna Vikhe Patil spoke about the resignation of Dhananjay Munde

नांदेड : सरपंच वाल्मिक कराड यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. सतत गंभीर आरोप हे होताना दिसत आहेत. या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याची चाैकशी सुरू असून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीये. वाल्मिक कराडवर गंभीर आरोपी केली जात आहेत. हेच नाहीतर आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

एनसीपीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठिशी असल्याचे दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच स्पष्ट केले की, यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना दिसत आहेत. धनंजय मुंडेंना टार्गेट केले जात असल्याने ओबीसी नेतेही आक्रमक होत आहेत.

आता नुकताच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दिसले आहेत. त्यांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणाले की, त्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आहे. एसआयटीतील आक्षेप असणारे कर्मचारी बदलले आहेत. विधीतज्ञ देखील नेमले. कोणी राजीनामा मागितला तरी चौकशी करावी लागते. यासोबतच ते पुढे म्हणाले की, सत्य बाहेर येईल.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल महायुतीतील अनेक मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजीनाम्याची मागणी होत असतानाच धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकिय वर्तुळात विविध चर्चा या रंगताना दिसल्या. एनसीपीच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगताना दिसली.

Web Title: Radhakrishna Vikhe Patil spoke about the resignation of Dhananjay Munde

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here