Home अहमदनगर शिवरायांच्या  पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली – विखे...

शिवरायांच्या  पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली – विखे पाटील

शिवरायांच्या  पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली – विखे पाटील

लोणी: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार केवळ पैसे वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करत असून या कृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विधानसभेत सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले कि, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील १२१.२ मीटर उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्याता मिळाली होती. त्यामध्ये ८३.२ मीटर महाराजांच्या पुतळ्याची उंची तर ३८ मीटर तलवारीची उंची होती.

परंतु भाजप शिवसेनेच्या सरकारने केवळ खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची एकूण १२१.२ मीटर उंची तशीच ठेवली मात्र छत्रपतींच्या पुतळ्याची उंची ८३.२ मीटर वारीन ७५.७ मीटर इतकी कमी केली तर तलवारीची उंची ३८ मितार्वरून ४५.५ मीटर पर्यंत वाढविली. तसेच छत्रपतींच्या पुतळ्याचा चोथारा ९६.२ मी.वरून ८७.४ मीटर पर्यंत कमी करण्यात आला आहे.

यापूर्वी हा विषय सभागृहात उपस्थित झाला असताने सरकारने ५६ इंचाची छाती करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जाणार नाही असे सभागृहात सांगितले  होते. तरीही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी करण्यासाठी मान्यता दिल्याचे सांगून विखे पाटील यांनी या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here