Home संगमनेर पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग; संगमनेर तालुक्यात भूसंपादन सुरु, असा असणार मार्ग

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग; संगमनेर तालुक्यात भूसंपादन सुरु, असा असणार मार्ग

Pune Nashik High Speed Railway: संगमनेर (Sangamner) तालुक्यातील २६ गावे ; १५ गावांतील जमिनींचे मूल्यांकन, थेट खरेदीअंतर्गत ९८ खरेदीखत.

Pune Nashik High Speed Railway Land acquisition started in Sangamner taluka

संगमनेर : भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील २६ गावांतून ७० किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग जातो. सध्या तालुक्यातील १५ गावांतील जमिनींचे मूल्यांकन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केल्याने थेट खरेदीअंतर्गत आतापर्यंत ९८ खरेदीखत झाली आहेत, असे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पुणे-नाशिक हायस्पीड तथा मार्गाचे भूसंपादन अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

बहुप्रतीक्षित असलेल्या नाशिक- पुणे रेल्वेमार्गाने पूर्णत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या रेल्वे मार्गाला राज्य शासनाने अर्थसंकल्पीय मंजुरीसह आर्थिक पहिल्या ‘पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड समभाग देण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी देशातील  पहिल्या नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी संगमनेर तालुक्यातील जमिनींचे मोजमाप व त्यांचे मूल्य जिल्ह्यांतून जाणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वे नाशिक ही दोन महत्त्वाची महानगरे पठार भागात जमीन मोजणीची प्रक्रिया निश्चितीकरण झाल्यानंतर पुणे मार्गासाठी संगमनेर तालुक्यात थेट रेल्वे मार्गाद्वारे जोडली जाणार झाली होती. प्रत्यक्ष आवश्यक जमिनीचे मोजमाप व त्यांचे मूल्य निश्चितीकरण झाल्यानंतर अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून जाणाऱ्या नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी संगमनेर तालुक्यात भूसंपादन सुरू झाले आहे. पुणे आणि नाशिक ही महत्वाची महानगरे थेट रेल्वे मार्गाद्वारे जोडली जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान प्रवासासाठी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी आवश्यक 1,450 हेक्टरपैकी 30 हेक्टर खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसीएल) देण्यात आली. तसेच सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सुरू आहे. 

पुणे – नाशिक असा थेट मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे या तिनही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकर्‍यांचा शेतमाल ने-आण करण्याची मोठी सुविधा  निर्माण होणार आहे.

मुंबई, पुणे, नाशिक या बड्या शहरांच्या मध्यावर संगमनेर तालुका आहे. मुंबई- पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणावर पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची महानगरे थेट रेल्वे मार्गाद्वारे जोडली जाणार आहेत. त्याचा सर्वाधिक लाभ संगमनेर तालुक्याला होणार आहे.

संगमनेर तालुक्यातील २६ गावांमध्ये २९३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्यापैकी आतापर्यंत थेट खरेदीने १९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. त्या माध्यमातून संबंधितांना १२९ कोटी रुपये वितरित पूर्ण होऊ शकते. करण्यात आले आहेत. वनविभागाची ४६ हेक्टर जमीन, सरकारची १५ हेक्टर जमीन रेल्वे मार्गात जाणार आहे.

पोखरी हवेली, अंभोरे, कोळवाडे, येळखोपवाडी, अकलापूर, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबूत बुद्रूक, साकूर, माळवाडी, बोटा, रणखांबवाडी, पिंपरणे, जाखुरी, खंडेरायवाडी या १५ गावांतील थेट खरेदी अंतर्गत आतापर्यंत ९८ खरेदीखत झाली असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. तसेच समनापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, पळसखेडे, निर्माण, सोनेवाडी, पिंपळे, पारेगाव खुर्द, खराडी, नान्नज दुमाला, केळेवाडी या ११ गावांतील भूसंपादन जमिनींचे मूल्यांकन मंजूर झाल्यानंतर होणार आहे.

शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उर्वरित ११ गावांमध्येही चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी या वर्षीच्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.- – डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, पुणे-

२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, पुणे- अहमदनगर-नाशिक जिल्ह्यांतून जाणार आहे. दोनशे किलोमीटर प्रतितास वेग, पुढे हा वेग २५० किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापता येणार आहे. पुणे-नाशिकदरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग प्रस्तावित आहेत. भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम होणार आहे.

Web Title: Pune Nashik High Speed Railway Land acquisition started in Sangamner taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here