Home ठाणे वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तब्बल 13 महिलांची सुटका

वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तब्बल 13 महिलांची सुटका

Thane Crime News: वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या चार जणांना अटक.

Prostitution racket busted, as many as 13 women rescued 

ठाणे: ठाणे पोलिसांनी गुरुवारी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या चार जणांना अटक केली. यावेळी पोलिसांनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या 13 महिलांचीही सुटका केली. तक्रारींच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ छापा टाकला. यावेळी, तीन महिलांसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, परिसरातील एसटी बस स्टॉपच्या मागे उघड्यावर बेकायदेशीरपणे हे  काम सुरू होतं.

या कारवाईत पोलिसांना बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आल्याचं डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितलं. घटनास्थळावरून 13 महिलांची सुटका करण्यात आली आणि अधिक सुरक्षिततेसाठी त्यांना उल्हासनगर येथील आश्रयगृहात पाठवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे आणि ते किती काळापासून चालवलं जात होतं याचाही तपास केला जात आहे.

सुटका केलेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, त्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, या महिलांना समुपदेशन आणि सरकारी योजनांद्वारे मदत दिली जाईल. दरम्यान, अशा बेकायदेशीर कारवायांविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरूच राहील, असंही डीसीपी झेंडे यांनी सांगितलं. त्यांनी लोकांना आवाहन केलंय की, जर त्यांना अशा कोणत्याही हालचालींबद्दल माहिती असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांना कळवावं. रॅकेटशी संबंधीत पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Prostitution racket busted, as many as 13 women rescued 

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here