Home महाराष्ट्र लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; चार महिलांची सुटका

लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; चार महिलांची सुटका

Prostituition Business: वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजमध्ये धाड टाकून पोलिसांनी व्यवस्थापकासह दोघांना अटक.

Prostitution in lodges Rescue of four women

धाराशिव: वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजमध्ये धाड टाकून पोलिसांनी व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. धाराशिव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (दि.२१) ही कारवाई केली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात लॉजचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (दि.२२) धाराशिव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक

माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याविषयी माहिती काढण्यासाठी गस्तीसाठी फिरत होते. धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या निसर्ग गारवा लॉज येथे काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत असल्याची माहिती समजली. त्यावरून पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एका बनावट ग्राहकास या लॉजवर पाठवून या माहितीची खात्री करून घेतली. दु. ४ वाजेच्या सुमारास लॉजमध्ये धाड टाकली. यावेळी लॉजमध्ये ४ महिला आढळून आल्या. महिला पोलिसांनी त्यांची विचारपुस केली असता लॉज व्यवस्थापक दिलीप रामदास आडसुळे (६३, रा. धाराशिव), दलाल बालाजी चंद्रकांत गवळी (२९, रा. धाराशिव) हे दोघे लॉजमालक नितीन रोहीदास शेरखाने (रा. धाराशिव) यांच्या सांगण्यावरून त्या महिलांना देहविक्रयाच्या उद्देशाने आश्रय देवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परावृत्त करीत होते. या अनुषंगाने पोलिसांनी लॉज मॅनेजर दिलीप आडसुळे, बालाजी गवळी यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, अॅटोरिक्षा (एम.एच. ०९ जे ८१३४) , १६ हजार १३० रुपयाची रोकड व इतर साहित्य असा एकूण ७१ हजार १३० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन लॉजमालक नितीन शेरखाने याच्यासह तिघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोरे, हावलदार अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अंमलदार साईनाथ आशमोड, योगेश कोळी, रंजना होळकर, अमंलदार भोसले, अरब यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटकेतील दोघांना पोलिसांनी शुक्रवारी धाराशिव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Prostitution in lodges Rescue of four women

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here