Home उस्मानाबाद लॉजमध्ये सुरु होता भलताच प्रकार, पोलिसांनी छापा मारला अन…

लॉजमध्ये सुरु होता भलताच प्रकार, पोलिसांनी छापा मारला अन…

Prostitution Business: लॉजमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या कुंटणखाना चालू असल्याची माहिती मिळाली,  पोलिसांनी दोन लॉजवर धाड टाकली अन् धाडीत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

Prostitution Business started in the lodge, the police raided

उस्मानाबाद: वेश्या व्यवसाय सुरु असणाऱ्या लॉजची खबऱ्याने पक्की माहिती दिली. याआधारे पोलिसांनी दोन लॉजवर धाड टाकली अन् धाडीत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन एम. रमेश, सह. पोलीस अधीक्षक उप विभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविद्रं गायकवाड पोलीस ठाणे कळंब, पोलीस उप निरीक्षक श्रीमती वर्षा साबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळंब शहरातील शिवप्रसाद लॉजमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या कुंटणखाना चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन डमी ग्राहक यांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली. तेव्हा सदर ठिकाणी कुंटणखाना चालू असल्याचे दिसून आलं.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण हद्दीमध्ये मयुरेश हॉटेल लॉज ॲन्ड बार याच्या जवळ वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. तिथे एक डमी ग्राहक यांना सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास छापा मारला. तिथे पीडित महिला मिळून आली.

तिच्या सांगण्यावरून रंजित रघुनाथ भोसले, गौरी लोकनाट्या कला केंद्र वडगाव येथील पार्टी मालकीनने येडशी उड्डाणपुलाजवळ उस्मानाबाद ते बीड जाणारे रोडलगत मयुरेश हॉटेल लॉज ॲन्ड बार मालक नानासाहेब तानाजी पवार, लॉजचालक रंजित रघुनाथ भोसले, प्रदिप त्रिंबक मुंढे, मनोज काकडे यांनी संगणमत करून पैशांसाठी लॉजवर वेश्याव्यवसायासाठी रुम उपलब्ध करुन दिल्या. यानंतर पोलिसांना महिलांची सुटका करुन लॉज चालक- मालक नानासाहेब तानाजी पवार यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास छापा मारला तेव्हा तिथे कुंटणखाना चालविणारा गोविंद श्रीमंत अप्पा लोखंडे, बाबु श्रीमंत अप्पा लोखंडे, ग्राहक इसम बिलाल शेख नुर बागवान आणि ज्ञानेश्वर भाउराव होनमाने, संतोष प्रकास लिके (वय ३५ वर्षे रा खरडा), विजय सुभाष इगंळे (वय ३२ वर्षे रा वाकुद, ता.जामनेर), असे एकुण ६ जण मिळून आले. सदर ठिकाणाहून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. सदर व्यक्तींविरुध्द कळंब पोलीस ठाण्यात कलम ३७०, ३७० अ (२), ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Prostitution Business started in the lodge, the police raided

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here