Home नाशिक कसारा जवळ खासगी बसचा अपघात ; बस एका नाल्यात पलटी

कसारा जवळ खासगी बसचा अपघात ; बस एका नाल्यात पलटी

Bus Accident: वळनावर टुरिस्ट बस च्या चालकाचे नियंत्रण सुटले व बस एका नाल्यात पलटी.

Private bus accident near Kasara

नाशिक: महामार्गावर भीषण अपघात झाला. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील चिंतामणवाडी जवळ मुंबईहून सिन्नरला जाणाऱ्या टुरिस्ट बस क्रमांक एम. एच. 46 बी बी 2185 यावरील चालकाचा ताबा सुटला. त्‍यामुळे या बसला एका वळणावर आपघात झाला. यामध्ये 20 हून अधिक जन जखमी झाले. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गभीर असून त्यांना जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अन्य जखमींना खर्डी व कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई येथून नाशिक येथे लग्ना करीता जात असताना चिंतामण वाडी येथील वळनावर टुरिस्ट बस च्या चालकाचे नियंत्रण सुटले व बस एका नाल्यात पलटी झाली. या भिषण अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य गुरुनाथ वाताडे, बाळू मांगे, कैलास गतिर, फय्याज शेख, स्वप्नील कलंत्री, अक्षय लाडके यांनी घटनास्थली धाव घेत मदत कार्य केले. कसारा पोलीस व शहापूर महामार्ग पोलीस यांच्या मदतीने नरेंद्रचार्य संस्थान रुग्णवाहीका व जिजाऊ रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर किरकोळ जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, महामार्ग पोलीस अधिकारी छाया कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी करून क्रेनच्या व पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने आपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामध्ये 4 जनाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बस चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून बस चालकाच्या म्हणण्यानुसार बसला पाठीमागून एका ट्रेलर ट्रकने कट मारल्यामुळे बस वरील नियंत्रण सुटले असल्याची माहिती दिली.

Web Title: Private bus accident near Kasara

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here