पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात घेणार ५० प्रचार सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात घेणार ५० प्रचार सभा
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ५० प्रचारसभा घेऊन लोकसभेच्या १०० हून अधिक मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरींवर ही मोदींच्या मदतीसाठी प्रत्येकी ५० अशा एकूण १५० सभा घेणार आहेत. यामुळे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसल्याचे स्पष्ट होत आहे.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या फेब्रुवारी महिन्यापासून देशभरात ५० प्रचार सभा घेऊन १०० अधिक लोकसभा मतदार संघापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी माहिती भाजपच्या गोटातील सूत्रांनी शुक्रवारी दिली. या सर्व सभांद्वारे पंतप्रधान सत्ताधारी पक्षासाठी देशभरात पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.