Home क्राईम शिक्षकाला पोलीस असल्याची बतावणी करत तीन तोळ्याचे दागिने लंपास

शिक्षकाला पोलीस असल्याची बतावणी करत तीन तोळ्याचे दागिने लंपास

Pretending to be a policeman, the teacher theft three lamps

पाथर्डी | Pathardi:  पाथर्डी शहरातील माणिकदौडी चौकात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मी पोलीस आहे, तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरता. येथे खुप चोर्‍या (theft) होत आहे. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्यांची चैन व हातातील अंगठी काढा आणि तुमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून प्राथमिक शिक्षकाकडील तीन तोळ्यांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी आण्णासाहेब शेळके (रा. विजयनगर ता. पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार शेळके हे शुक्रवारी सायंकाळी माणिकदौडी चौक येथून घरी पायी जात असतांना चौकात हेल्मेट घातलेला एक व्यक्ती दुचाकीवरून शेळके यांच्याकडे आला. मी पोलीस आहे. तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरत आहात. येथे खुप चोर्‍या (theft) होत असून तुमच्या पिशवीत ठेवा. त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीला बोलावून घेतले व त्याला सांगितले, की तु तुझ्या गळ्यातील सोन्यांची चैन तुझ्या पिशवीत काढुन ठेव येथे खुप चोर्‍या होत आहेत.

त्या इसमाने त्याच्या गळ्यातील चैन त्याच्याच पिशवीत काढून ठेवली. त्यावेळी शेळके यांनी देखील त्यांच्या गळातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी त्यांच्या स्वतःच्या पिशवीत काढुन ठेवली. त्या व्यक्तीने शेळके यांच्या पिशवीला गाठ मारुन दिली व तुम्ही आता लगेच घरी जा असे म्हणाला. शेळके हे त्यांची पिशवी घेवुन पायी घरी गेले. घरी जावून पिशवीत चैन व अंगठी पाहिली असता पिशवीत चैन व अंगठी मिळुन आली नाही. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pretending to be a policeman, the teacher theft three lamps

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here