Home अहमदनगर अहिल्यानगर: राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाची आत्महत्या

अहिल्यानगर: राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाची आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar Suicide: राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

President's award winning teacher commits suicide

अहिल्यानगर: राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले शिक्षक व सारोळा कासारचे (ता. नगर) रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल, रविवारी ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नामदेव धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली असता ते मयत झाले असल्याचे सांगितले. तशी माहिती सायंकाळी नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. मयत नामदेव धामणे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषदेच्या गाडेकर मळा (चिखली, ता. श्रीगोंदा) येथे ते कार्यरत होते, त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, खिशात चिड्डी सापडली असून माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार धरू नये, असा मजकूर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: President’s award winning teacher commits suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here