संगमनेर: वॉरंट बजावणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा
Sangamner Crime: न्यायालयीन वारंट बजाविण्यास गेलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबल यांना दोघाजणांनी धक्काबुक्की केल्याची घटना.
संगमनेर: न्यायालयीन वारंट बजाविण्यास गेलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबल यांना दोघाजणांनी धक्काबुक्की केल्याची घटना तालुक्यातील कोंची येथे घडली. सदर घटना सोमवार ता.(३१) जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता घडली आहे. या प्रकरणी दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय रानोजी बढे हे सोमवारी सायंकाळी न्यायालयीन वाॅरंट बजविण्यास कोंची येथे गेले होते. त्यावेळी सम्राट आप्पासाहेब कडलग (वय २७ रा.जवळे कडलग) व प्रमोद मनसुख जोंधळे (वय ३३ रा. कोंची) या दोघा जणांनी संजय बढे यांना धक्काबुक्की करून न्यायालयीन वाॅरंट बजविण्याच्या शासकीय काम करणे पासून अडथळा निर्माण करत शासकीय कर्तव्य करून दिले नाही. व शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय बढे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज अहिरे हे करत आहे.
Web Title: a policeman who served a warrant was pushed Crime against both
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App