स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी डमी ग्राहक पाठविला अन् देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश
Sex racket in Spa Centre: लातूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील रिंग रोड परिसरात एका स्पा सेंटरच्या सुरू असलेलं देह व्यापाराचे रॅकेट उघडकीस आलं आहे.
लातूर: लातूर पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्राफिकिंग युनिटने स्पा सेंटरवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.
यात महिलांना जबरदस्तीने अनैतिक धंद्यात ढकळण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर यातील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांनी एकूण सहा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिंग रोड भागात एका स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी लातूर पोलिसांनी स्पा सेंटरवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली. आरोपींच्या चौकशीत काही महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढून अनैतिक धंद्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. यानंतर चार महिलांना अँटी ह्यूमन ट्राफिकिंग पथकाने सोडवले. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्पा सेंटरच्या अवैध धंद्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Web Title: Police send dummy customer to spa center, bust sex racket