वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा! दोन महिलांची सुटका!
Pune Prostitution Business: महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस.
पुणे : धानोरीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली, तसेच स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक सूरज भरत शाहू (३०, रा. गुलविल स्क्वेअर मॉल, धानोरी जकात नाका, मूळ रा. वाशी, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक छाया जाधव यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, गुडविल स्क्वेअर मॉल, दुसरा मजला, शॉप नं. २१४ येथे अरोमोनिआ फॅमिली स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. चौकशीत सूरज शाहू याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरमधून २२ हजार ५०० रुपये, मोबाइल, ग्राहक नोंद वही, पवनकुमार हरिशंकर अगरवाल या नावाची ग्राहक नोंद व अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. पुण्यात एका आठवड्यात तीन ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे.
Web Title: Police raid on prostitution Rescue of two women
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study