Home क्राईम Raid: वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा

Raid: वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा

Prostitution Business raid:  खुलेआम शरीर विक्रीचा व्यवसाय, 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

A police raid on prostitution business, crime against three

संगमनेर: तालुक्यातील वडगावपान परिसरातील विशाल गार्डन हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या साई माया लॉजमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त  करण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरातील लॉजमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम शरीर विक्रीचा व्यवसाय (Prostitution Business) सुरू होता. याबाबत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती समजत त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री नऊ वाजता सुमारास या लॉजवर छापा टाकला होता. या लॉजमध्ये काहीजण संगनमताने स्वतःचे आर्थिक फायद्या करिता कुंटण खाना चालवत होते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये कुंटण खाण्यासाठी लागणारे साहित्य आढळले होते. याबाबत सहाय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रतीक बाळासाहेब चित्तर (रा. वडगावपान), एक महिला, खेमराज कृष्णराज उपाध्याय (रा. वडगावपान) यांच्याविरुद्ध गुन्हा नैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे हे करीत आहे.

Web Title: A police raid on prostitution business, crime against three

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here