अहिल्यानगर: गोल्डन कॅफेवर पोलिसांचा छापा, अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू…
Breaking News | Ahilyanagar: ‘गोल्डन कॅफे मध्ये अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असल्याची माहिती.
नगर : शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात चालवल्या जात असलेल्या ‘गोल्डन कॅफे मध्ये अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे (वय २४, रा. ताठे मळा, पपिंग स्टेशन रस्ता, बालिकाश्रम सता, अहिल्यानगर) वाध्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (क) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कॅफेमध्ये प्लायवुडचे कंपार्टमेंट करून, त्यास पडदे लावून, शाळा-कॉलेजातील मुला-मुलींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी. पाटील, अंमलदार सुनील शिरसाठ, सतिष त्रिभुवन, छाया गायकवाड आणि दोन पंचांसह पथकाने शनिवारी (२६ एप्रिल) दुपारी १.२५ वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान, काउंटरवर उपस्थित असलेला ओंकार ताठे याने स्वतः कॅफेचा मालक असल्याचे सांगितले. तपासणी दरम्यान कॅफेच्या आतमध्ये सहा बाय तीन फूट लांब व रुंद अशा टिनच्या फत्र्याचे कंपार्टमेंट बनवले होते आणि बाहेरून पडदे लावण्यात आले होते. आतमध्ये सोफे बसवण्यात आले होते, परंतु कॉफी शॉपचा कोणताही परवाना अथवा कॉफी बनवण्याचे साहित्य आढळून आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या युवक-युवतींना समज देऊन सोडले असून, सदर ठिकाणी लावलेले पडदे काढून टाकण्यात आले.
Breaking News: Police raid Golden Cafe, obscene activities continue