डॉक्टरांच्या पार्टीवर पोलिसांचा छापा, चार नर्तकींसह नऊ जण ताब्यात
पाचगणी | जि. सातारा: भिलारपासून जवळच असलेल्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून चार नर्तकींसह नऊ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये सहा डॉक्टरांचा समावेश आहे. पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर काही युवती तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाच करीत होत्या. याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आंचल – दलाल यांना मिळाली. त्यांनी साताऱ्यावरून विशेष पथक कासवंड येथे रवाना केले. सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक, असे सहा डॉक्टर नर्तकींच्या समोर झिंगत असताना पोलिसांना सापडले.
गुन्हा दाखल झालेले डॉक्टर
डॉ. हनुमंत मधुकर खाडे (वय ६५), डॉ. रणजित तात्यासाहेब काळे (४२), डॉ. मनोज विलास सावंत (४०, तिघेही दहिवडी), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (४०, रा. मलकापूर, ता. कराड), डॉ. राहुल बबन वाघमोडे (वय ३१, रा. गोंदवले, ता. माण) आणि डॉ. नीलेश नारायण सन्मुख (३९, रा. लक्ष्मी मार्केट, मिरज).
तसेच इतर प्रवीण शांताराम सैद (४०, फार्मासिस्ट, राहणारा आलडिया, माळुंगे पाडळे, ता. मुळशी, जिल्हा पुणे), विशाल सुरेश शिर्के (३६, हॉटेलचालक, रा. पसरणी, ता. वाई) आणि उपेंद्र ऊर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (३१, वेटर),
पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूममधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत वा त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ च्या कलम ३, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Police raid doctor’s party, nine people including four dancers detained
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App