अहिल्यानगर: अश्लील चाळे करणाऱ्या सात महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Breaking News | AhilyaNagar crime: पुरुषांना अश्लील हावभाव, हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी अटक केली.
केडगाव : चौफुला परिसरात ये-जा करणाऱ्या पुरुषांना अश्लील हावभाव, हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी अटक केली आहे. चौफुला ते सुपा रोडवर पीएमटी बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाजवळ काही महिला अर्धनग्न कपडे घालून देहप्रदर्शन करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या दरम्यान, केडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार बी. पी. शेंडगे, पोलीस हवालदार पी. एस. मस्के, महिला पोलीस शिपाई स्वप्नाली टिळवे आणि पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी तातडीने महिला पंच घेत माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी बोरीपार्धी- चौफुला हद्दीत, केडगाव ते सुपा रोडवरील पुलाजवळ पीएमटी बस थांब्याजवळ ६ ते ७ महिला अश्लील वर्तन करत पुरुषांना अश्लील हावभाव व हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करताना आढळल्या.
या प्रकरणी पोलिसांनी उरुळी कांचन आणि दौंड तालुक्यातील सात महिलांना ताब्यात घेतले. मंगळवारी (दि. ३) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी फिर्याद दिली आहे.
Web Title: Police arrested seven women who committed obscene chala
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study