Rape: धक्कादायक: लेक्चरर महिलेवर पोलिसांकडून बलात्कार
पिंपरी | Pimpri: लेक्चरर महिलेवर एका पोलिसानेच बलात्कार (rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर २०२० ते २ जानेवारी २०२२ या कालावधीत भोसरी, साखरेवस्ती आणि हिंजवडी फेज या ठिकाणी हा प्रकार घडला.
आकाश प्रकाश पांढरे वय ३० रा. रावेत असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पिडीत २८ वर्षीय लेक्चरर महिलेने २६ फेब्रुवारी रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी आकाश पांढरे हा ह हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्त आहे. फिर्यादी पिडीत महिला नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवते. पिडीत महिला तिच्या मुलीसोबत राहते. ती एकटी राहत असल्याचा फायदा त्याने घेतला. आकाश पांढरे याने महिलेला पोलीस असल्याचे सांगितले. तु एकटी कशी राहतेस बघतो असे म्हणून महिलेला धमकी दिली. लग्नाचे आमिष दाखवत महिलेसोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले. त्यापासून महिला गरोदर राहिली. त्यानंतर आकाश पांढरे याने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला लावून गर्भपात घडवून आणला. असे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Pimpri Lecturer woman rape by police