संगमनेर: मुलीला उचलून नेईन, नवर्याला मारून टाकीन धमकावत शारीरिक संबंध, आर्थिक ब्लॅकमेल
Sangamner Crime: , प्रेम संबंध बद्दल नवऱ्याला माहिती देईल असे वारंवार धमकावत विवाहित महिलेचे शारीरिक संबंध निर्माण करत तिला आर्थिक ब्लॅकमेल केल्याचा प्रकार.
संगमनेर: तुझ्या मुलीला उचलून नेत परस्पर मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, प्रेम संबंध बद्दल नवऱ्याला माहिती देईल असे वारंवार धमकावत विवाहित महिलेचे शारीरिक संबंध निर्माण करत तिला आर्थिक ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
संगमनेर शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका विवाहित महिलेशी ओळख निर्माण करत आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. पीडित महिला आणि आरोपीची २०२२ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून २६ मे २०२२ रोजी आरोपी सोनवणे याने पीडित महिलेला त्याच्या राहणे मळा येथील राहत्या घरी बोलावून घेतले होते. घरी एकटाच असलेल्या सोनवणे यांने यावेळी मी तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाईल अशी धमकी देत पीडित महिलेवर अत्याचार केला.
त्यानंतर आरोपीने वारंवार पीडित महिलेला मुलीला उचलून नेईल तिला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल असे धमकावत पीडित महिलेच्या घरी, स्वतःच्या घरी तसेच नांदूर शिंगोटे येथील संकेत लॉजवर महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्यानंतर आपले प्रेम संबंध असल्याचे तुझ्या नवऱ्याला सांगेल असे धमकावत वारंवार विविध बहाने करत या महिलेकडून पैसे काढून घेतले. तब्बल पाच लाखावर रोकड तसेच सोन्याचे मंगळसूत्र गाळून काढलेले रक्कम आरोपीने महिलेकडून घेतली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार १२ जानेवारीपर्यंत सुरू होता.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहरालगतच्या राहणे मळा येथील ओमकार नामदेव सोनवणे या आरोपीविरुद्ध शनिवारी संध्याकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३०८ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२५ नुसार बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल पुढील तपास करत आहे.
Web Title: pick up the girl, kill the husband threatening physical relations, financial blackmail
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News