पिचड यांनी कोणताच माणूस मोठा होऊ दिला नाही- आ.लहामटे
Akole | Kiran Lahamate: पिचड पिता पुत्रांवर नवा सोंगाड्या पिक्चर काढायला हवा अशी टीका आमदारांनी केली.
अकोले: समाजातील कोणताच माणूस पिचडांनी मोठा होऊ दिला नाही. अगस्तीत देखील तेच केल. अगस्ती चालू ठेवण्यासाठी समृद्धी मंडळ कटिबद्ध असून, कारखाना बंद पाडण्याचे विरोधकांचे षडयंत्र हाणून पाडू, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे. अकोले येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते होते. अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, अशोक भांगरे, मधुकर नवले, अमित भांगरे, महेश नवले, विजय वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, वसंत मनकर, मारुती मेंगाळ आदी उपस्थित
अगस्तीची बदनामी दशरथ सावंत यांनी केली अन् चेअरमन टाळ्या वाजवत होते. निवडणुकीचे काही होऊद्या, कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जळालेल्या उसाला सावंत हेच जबाबदार असून, कारखाना सुरू करण्यासाठी पिचड यांनी एकदाही मिटिंग बोलावली नाही. गारव्याचे खरे जनक मधुकर पिचडच, असे गायकर म्हणाले. सावंतानी अगोदर आपली जबादारी सिद्ध करावी अन मग आरोप करावे असे गायकर यांनी म्हंटले आहे. उस जाळून नेला याला दशरथ सावंत हे जबाबदार आहेत अशी टीका महेश नवले यांनी केली आहे.
Web Title: Pichad did not allow any man to grow up Kiran Lahamate