Home अहमदनगर Crime: शेतीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण

Crime: शेतीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण

Pathardi Crime Shooting at gunpoint over agricultural disputes

पाथर्डी  | Pathardi Crime:  शेतीच्या वादातून  बंदुकीचा धाक दाखवत  जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथील सहा जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास रामकिसन भिसे,रामकिसन भिसे, भैय्या ओमप्रकाश भिसे, चंद्रकला रामकिसन भिसे,कविता विकाश भिसे,शोभा ओमप्रकाश भिसे सर्व (रा.तोंडोळी ता.पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत  किरण विश्वनाथ दरेकर (रा.तोंडोळी) यानी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार दरेकर आणि भिसे यांची शेजारी शेते असून त्यांच्यात नेहमी वाद होत असतात.

रविवार (दि. 20) सकाळी विकास रामकिसन भिसे यांनी दरेकर यांच्या मालकीच्या शेतामधील कपाशीत बैल बांधला होता.त्यावेळी किरण दरेकर यांनी आमचे शेतातील बैल सोडुन घे असे सांगितले. यावरून कविता विकास भिसे,शोभा ओमप्रकाश भिसे यांनी किरण दरेकर यांना शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर विकास भिसे यांच्या वडिल रामिकसन भिसे व भैय्या ओमप्रकाश भिसे व चंद्रकला रामकिसन भिसे सर्व घटनास्थळी आले.

येतांना त्यानी सोबत परवाना असलेली बंदुक सोबत आणत बंदुकीचा धाक दाखवून तुम्हाला जिवंत ठार मारुन टाकीन असा दम दरेकर यांना दिला. तसेच भिसे कुटुंबियांनी दरेकर यांच्या कुटुंबियांना अश्लील शिविगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण केली व विकास याने त्याचे हातातील बंदुकीचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pathardi Crime Shooting at gunpoint over agricultural disputes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here