रेल्वे पोलिसाचा मृतदेह तब्बल ५० तासांनी नदीपात्रात आढळला
पारनेर | Parner: गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखाली रुईचोंडा धबधबा येथे तीन मित्रांसोबत गेलेले रेल्वे पोलीस भोवऱ्यात सापडून बुडाले होते. गणेश दहिफळे असे त्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी त्याचा मृतदेह धरणाखालील नदीपात्रात वासुंदेच्या ठाकरवाडीत आढळून आला आहे.
गणेश दहिफळे यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. मनोज कुमार यांच्या नेतृत्वात तब्बल १८ जणांच्या पथकाने ६ तास शोध मोहीम राबवीत पाणबुडीच्या साह्याने डोहात शोध घेतला होता. मात्र दहिफळे यांचा शोध लागला नव्हता. शोध मोहीम ही अखेरीस थांबविण्यात आली होती.
सायंकाळी काही आदिवासी व्यक्तींनी नदीपात्रात एक मृतदेह असल्याची माहिती दिली होती.यावरून दहीफळे यांचा शोध लागला, महसूल व पोलिसांनी संध्याकळी दहिफळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Parner Railway police dead body Found