पारनेरचे पाच नगसेवक पुन्हा शिवसेनेत, मातोश्रीवर घेतली भेट
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनच्या पाच नगर सेवकांनी शनिवारी ४ जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर ते आज पुन्हा शिवसेनेत आले आहे.
उप मुख्यमंत्री यांच्या उपस्थित या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचे सूर आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमचे नगसेवक पुन्हा पाठवा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं. मातोश्रीवरून नार्वेकर यांनी अजित पवार यांना फोन केला होता. मंगळवारी अजित पवार आणि ठाकरे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा सुरु होती.
बुधवारी मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांना मंत्रालयात बोलाविले होते. यावेळी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक तेथे उपस्थित होते. पवार यांनी पाचही नगरसेवकाना नार्वेकरांकडे सोपविले होते.
यानंतर या पाचही नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात आले. नगरसेवकांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीतील पेच आज सुटला आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Parner five corporates back to Shivsena