अहमदनगर: सहा बॉम्बच्या वृताने खळबळ, बॉम्बशोधक पथक
बॉम्बशोधक पथक (bomb squad), श्वानाच्या मदतीने तपासणी : एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.
जामखेड: तालुक्यातील नान्नज गावातील बालाजी मेडिकल या औषध दुकानासह इतरत्र आपण मेडिकल चालकाच्या मदतीने सहा बॉम्ब ठेवले आहेत. या बॉम्बचा काही वेळातच स्फोट होऊ शकतो, असा फोन मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष, मंबई यांना (१८) व्यक्तीने केला. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती अहमदनगर पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ बॉम्बशोधक पथक व श्वानासह नान्नज गावात तपासणी केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगोला तालुक्यातील दिनेश सुतार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवार सकाळी साडेनऊच्या सुमारास नान्नज गावामध्ये सहा बॉम्ब ठेवले आहेत. त्यासाठी नान्नज येथील एका मेडिकलवाल्याने मला मदत केली आहे, असा एक फोन मुख्य नियंत्रण कक्ष, मंबई यांना आला. त्यांनी अहमदनगर जिल्हा शाखेला कळवून पथक रवानाही केले. मात्र, शोध होईपर्यंत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ व परिसराची तपासणी केली तेव्हा बॉम्बसदृश्य कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सहायक फौजदार शिवाजी भोस यांच्या फिर्यादीवरून दिनेश सुतार याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला मुंबईत अटक….
नान्नजमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरविणारा आरोपी दिनेश सुतार याचा जामखेड पोलीस कसून शोध घेत होते. मात्र, तो वारवार जागा बदलत होता. तो सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिपाळे गावचा आहे. मात्र, तो मुंबईला राहत होता. मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या लोकेशनवरून अटक केली. त्याला ताब्यात घेण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्याचे पथक जाणार आहे.
Web Title: over reports of six bombs, bomb squad