अनैतिक संबंधास विरोध; मुलाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा
Breaking News | Vardha Crime: पाटा वारवंट्यातील वरवंटा उचलून आईच्या डोक्यात घातला यामध्ये आईचा जागीच मृत्यू.
वर्धा : चुकीच्या गोष्टीसाठी हटकले म्हणून मुलाने आईचा निर्घृण खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्यावर मुलाने रागाच्या भरात बाजूलाच असलेल्या पाटा वारवंट्यातील वरवंटा उचलून आईच्या डोक्यात घातला यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आर्वी तालुक्यातील खरंगणा हद्दीत असलेल्या काचनूर गावात ही घटना घडली आहे. सोपान मुरलीधर पुसदकर असे आरोपी मुलाचे नाव असून मृत आई मीरा मुरलीधर पुसदकर आहे. आरोपीस वडील नसून दोन बहिणींचे लग्न झाल्यानंतर आई व मुलगा दोघे सोबतच राहायचे. मुलाचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. आई त्यास विरोध करायची. त्यातूनच घटनेच्या दिवशी रात्री वाद झाला. वाद विकोपास गेल्यावर मुलाने रागाच्या भरात बाजूलाच असलेल्या पाटा वारवंट्यातील वरवंटा उचलून आईच्या डोक्यात घातला यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस पाटील उमेश अंभोरे यांनी खरंगना पोलीसांना या घटनेची माहिती दिली अन ठाणेदार सदाशिव ढाकणे गावात पोहचले. तसेच वरिष्ठ अधिकारी खंडेराव व वृष्टी जैन यांनी भेट देत तपासास दिशा दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद सानप तसेच धीरज मिसाळ, विठ्ठल केंद्रे, मनीष वैद्य, श्यामराव इवनाथे, वसंता पिसे, अमोल इंगोले, प्रतिभा पेंदाम, योगेश्री उके तपास करीत आहे. श्वानपथक तसेच ठसे तज्ञ यांची मदत घेऊन अधिक तपास सुरू आहे.
Web Title: Opposed to an immoral relationship The son put a crown on his mother’s head
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study