अहमदनगर: पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
Breaking News | Ahmednagar: चोरी किंवा घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक (Arrested).
नेवासा : चोरी किंवा घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील जेऊर हैबती (ता. नेवासा) येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय २६) याला नेवासा पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिस कर्मचारी नारायण एकनाथ डमाळे यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि.१९) रात्री ११ वाजता देडगाव ते तेलकुडगाव जाणाऱ्या रस्त्यावर देडगाव (ता. नेवासा) येथे विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे व सुनील दिलीप चव्हाण (गाव माहीत नाही) हे चोरी किंवा घातपात करण्याच्या तयारीने उभे होते. तेथे विठ्ठल तुपे हा बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगताना मिळून आला. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, पिवळ्या धातूची पिस्तूल बुलेट, दुचाकी, मोटारसायकल सोडून पळून गेलेल्या चव्हाण याच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.
Web Title: One person was arrested for carrying a pistol
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study