Home Accident News Accident: नगर परळी रेल्वे मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

Accident: नगर परळी रेल्वे मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

Ahmednagar Accident: चाचणी घेणाऱ्या रेल्वे इंजिनची धडक बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू.

One person died in an accident on the Nagar Parli railway line

अहमदनगर: नगर बीड परळी रेल्वे मार्गावर चाचणी घेणाऱ्या रेल्वे इंजिनची धडक बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. नगर तालुक्यातील नारायणगावडोह गावाच्या शिवारात या अपघाताची घटना घडली आहे.

पांडुरंग दौलत साठे (वय 76 रा. नारायणडोह) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साठे हे नारायणडोह शिवारात नव्याने टाकण्यात आलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅक नजिक आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले असता हा अपघात घडला. गायी चरत चरत रेल्वे रुळावर आल्या असता चाचणी घेणारे रेल्वे इंजिन समोरून आले. आपल्या गायींना वाचविण्यासाठी पांडुरंग साठे पुढे झाले, मात्र ते गायीला तर वाचवू शकले नाहीत, उलट त्यांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर मयत पांडुरंग साठे यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

Web Title: One person died in an accident on the Nagar Parli railway line

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here