राजूर ग्रामपंचायतीत आत्मदहन करण्याचा एकाचा प्रयत्न, तिघे ताब्यात तर सरपंचाचा आरोप
Breaking News | Akole: आत्मदहनाचा प्रयत्न, ३ जणांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवले.
राजूर: राजूर ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या निषेधार्थ मंगळवारी संतोष मुर्तडक यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
अकोले तालुक्यातील राजूर येथे नळाद्वारे आलेले अशुद्ध पाणी पिल्याने सुमारे चारशे रुग्ण कावीळ आजाराने त्रस्त होते. त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला. पाच जण गंभीर आहेत. गरीब रुग्णांना मदत व्हावी, ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा, ग्रामसेवकांना बडतर्फ काविळीचा करावे, आजार पसरवण्यास ग्रामपंचायत कारणीभूत असल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या व इतर मागण्यांचे निवेदन मुर्तडक यांनी दिले. या कारभाराची चौकशी न केल्यास आत्मदहन
अकोले तालुक्यातील राजूर (जि. अहिल्यानगर) ग्रामपंचायत कार्यालयात संतोष मुर्तडक यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी एकच गोंधळ उडाला.
आत्मदहन करण्याचा इशारा मुर्तडक यांनी दिला होता. संतोष मुर्तडक व इतर काही जण मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले. तेथे अंगावर डिझेल ओतून घेतले. यावेळी एकच गोंधळ झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी संतोष मुर्तडक व इतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी काविळ आजार प्रकरणी आठ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सदर समितीस चौकशी करून चाळीस दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.
पत्रातील मुद्देनिहाय चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर मुर्तडक यांनी आंदोलन थांबवले. राजूरमध्ये आता कावीळ आजार आटोक्यात आला आहे.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
संतोष मुर्तडक यांच्या आत्मदहनाचा विषय हा स्टंट बाजी होती, त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता व याला पोलिस प्रशासन जबाबदार आहे अशी माहिती राजूरचे सरपंच पुष्पा निगळे यांनी माध्यमांना दिली.
Breaking News: One person attempts self-immolation, three arrested