धक्कादायक! तरुणीवर सामूहिक अत्याचार
Breaking News | Chandarapur News: एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकी. दोन संशयितांना अटक.
चंद्रपूर | चिमूरः- चिमुर शहरातील एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे. प्रतीक सुनील साठोणे (वय 26), विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे (वय 29) (दोघे रा. नेताजी वार्ड), अंकित संजय काकडे (वय 31) अशी संशियातंची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर शहरातील पीडित तरुणी तिच्या आजीच्या घरी पायी जात होती. त्यावेळी संशयित आरोपी प्रतीक सुनील साठोणे यांने त्या तरुणीला आजीच्या घरी सोडतो अशी विचारणा केली. त्यानंतर तरुणी मोटारसाकलवर बसली. परंतु प्रतीकने तिला आजीच्या घरी न सोडता शहरापासून पाच किमी दूर अंतरावरील तळोधी नाईक गावाच्या शिवारातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर अन्य आरोपी विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे व अंकित संजय काकडे या दोघांनी घटनास्थळी जाऊन पीडितेवर अत्याचार केला. या प्रकाराची कुठे सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडितेला देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी 20 मेला पिडीत तरुणीने चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रतीक सुनील साठोणे आणि विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे यांना अटक करण्यात आली आहे तर अंकित संजय काकडे फरार झाला आहे. त्याच्या मागावर चिमूर पोलिस आहेत. या घटेनचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती मरकाम करीत आहेत.
Breaking News: Gang rape of young woman