गँगवार: पैशाच्या वादातून एकाची गोळी झाडून हत्या
Dhule Firing Murder: गोळी झाडून एकाची हत्या.
धुळे: धुळ्यात गँगवार अनुभवायला मिळाला. गोळी झाडून एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षाच्या व्यक्तीची दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करीत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
सदर हत्याचा प्रकार पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे तर एक जण अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्य करतो. तो रात्री घरी नसताना त्याच्या घरी आलेल्या काही जणांनी त्याच्या पत्नीला चिनू कोठे आहे याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर संशयीत दुचाकीवरून निघून गेले.
घरी आलेल्या त्या संशयीतांबाबत चिनू पोपली याच्या पत्नीने त्याला फोनवरून माहिती दिली, व काही वेळातच चिनू घराजवळ आल्यानंतर काही जण पुन्हा परत आले व त्या ठिकाणी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
या वादातच त्यांनी थेट आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर काढून चिनू पोपली याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चिनू जागीच कोसळला त्यानंतर या सर्वांनी त्या ठिकाणाहून पोबारा केल्यानंतर पत्नी व परिसरातील नागरिकांनी चीनूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु तोपर्यंत चिनूचा मृत्यू झाला होता. या संदर्भात घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघा संशयतांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.
Web Title: One firing shot dead murder due to money dispute