संगमनेर: ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
संगमनेर : भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ३० मार्च रोजी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील समनापूर गावच्या शिवारात घडली. याप्रकरणी १६ एप्रिलला संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत ठकाजी चांडे असे अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे. त्यांचे नातू शिवाजी भीमराज चांडे (रा. समनापूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकच्या (एमएच ४६-एफ ५९९४) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी करीत आहेत.
Web Title: One dies after being hit by a truck Accident Crime Filed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study