Home संगमनेर संगमनेर: घुमटाचा स्लॅब कोसळल्याने एक जणाचा मृत्यू, तीन जखमी

संगमनेर: घुमटाचा स्लॅब कोसळल्याने एक जणाचा मृत्यू, तीन जखमी

Breaking  Sangamner News: घुमटाचा स्लॅब कोसळल्याने एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी.

One dead, three injured due to dome slab collapse

संगमनेर: तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे चांदशावली दर्गाहच्या घुमटाला कळस चढवण्याचे काम सुरू असताना बुधवारी दुपारी अडीच वाजता घुमटाचा स्लॅब कोसळल्याने एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

सुभाष तुकाराम नरवड, वय 22, असे मृताचे नाव आहे, तर अनिल गोयल तिरवडल, वय 25 हा गंभीर जखमी असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अमोल व्यंकटी चुडामन, वय 18, बालाजी मारुती गुलवड, वय 30 असे जखमींची नावे आहेत. सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

गंभीर जखमी कामगारांना कुटे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार चालू असताना सुभाष तुकाराम नरवडे यांचा मृत्यू झाला. अनिल तीरवडल याची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: One dead, three injured due to dome slab collapse

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here