Home अकोले Bhandardara Dam: भंडारदरा धरण ओव्हरफ्लोच्या  मार्गावर

Bhandardara Dam: भंडारदरा धरण ओव्हरफ्लोच्या  मार्गावर

Bhandardara Dam: धरणांतून विसर्ग सुरु आहे. विसर्ग (क्युसेक) : भंडारदरा – 854, निळवंडे- 800, आढळा – 613, म्हाळुंगी – 540.

On the way to the Bhandardara dam overflow

भंडारदरा: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात जोरदार पाउस सुरु असून नवीन पाण्याची आवक वाढतच आहे. सोमवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 9039 दलघफू झाला होता. त्यामुळे पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास तसेच वाढल्यास हे धरण दोन ते  तीन दिवसांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

15 ऑगस्टला पूर्ण क्षमतेने हे धरण भरले जाते. पण सध्या जुलै महिन्यातच या धरणातील पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यात कालपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. 10500 दलघफू पाणीसाठा झाल्यास साठा नियंत्रित करण्यासाठी वाढीव पाणी नदीत सोडण्यात येते. तशीच वेळ दोन तीन दिवसांत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निळवंडे धरणही येत्या काही दिवसांत ओव्हरफ्लो होणार आहे. निळवंडे धरण पाणीसाठा ७७ टक्क्यावर पोहोचला आहे. प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Web Title: On the way to the Bhandardara dam overflow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here